Pradhan Mantri या महिलांना मिळणार 6000 हजार रुपये

Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2023:  केंद्र सरकारने महिलांसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केली आहे. आपल्या पहिल्या अपत्यासाठी मातेला पाच हजार रुपये दोन टप्प्यात दिले जातात, तर दुसरी मुलगी झाली तर थेट सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.

Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2023: केंद्र सरकारने महिलांसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या मुलानंतर 5000 रुपये तर दुसऱ्या मुलीनंतर 6000 रुपये देत आहे. माता आणि बालमृत्यू कमी करण्याबरोबरच भ्रूणहत्येला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने मातृ वंदना योजना राबविली जाते. आपल्या पहिल्या अपत्यासाठी मातेला पाच हजार रुपये दोन टप्प्यात दिले जातात, तर दुसरी मुलगी झाली तर थेट सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.

दरम्यान, सुरुवातीला तीन टप्प्यात योजनेची रक्कम थेट खात्यात जमा केली जात होती. आता दोन टप्प्यातच पाच हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. दरम्यान, यापूर्वी तीन टप्प्यात तीन वेगवेगळ्या टप्प्यांवर योजनेचा लाभ दिला जात होता.

गर्भधारणा झाल्यापासून सरकारी आरोग्य यंत्रणेला याबाबत कळविल्यापासून पहिल्या टप्प्याला सुरुवात होते. सरकारी रुग्णालयात प्रसूतीपूर्व एकदा तपासणी झाली की, दुसरा टप्पा बाळाच्या पहिल्या लसीकरणानंतर दिला जातो. पहिला हप्ता तीन हजारांचा तर दुसरा हप्ता दोन हजारांचा लाभ मातांना दिला जातो. शहरी महिलांसाठी महापालिका आरोग्य विभाग ही योजना राबवत आहे.

नियमावलीत सुधारणा
मातृ वंदना योजनेत आता सुधारणा करण्यात आली असून दुसरे अपत्य झाल्यानंतर 270 दिवसात अर्ज करता येणार आहेत. योजनेसाठी बाळाच्या पित्याच्या आधार कार्डाची अट रद्द के

Leave a Comment